विस्मरण आणि Bach Flower Remedies

Anagha Walimbe, BFRP

मावशीच्या ओळखीत एका बाईंना विस्मरण होते म्हणून समजले. त्यांची आर्थिक स्थिती  चांगली नसल्याने औषध उपचार मिळत नसल्याची खंत देखील तिला वाटत होती. त्या ताई स्वयंपाकाची कामे करायच्या पण, गॅस चालू राहतो, वस्तू कुठे ठेवली आठवत नाही, त्यामुळे चिडचिड, हातावरचे पोट, सगळी कामे गेली.. कोऱ्या चेहऱ्याने एकट्या बसून असतात, बोलायचे सुचत नाही, आणि त्यांचा नवरा देखील काही कमवत नसल्यामुळे, ह्यांचे आजारपण सुरू झाले तशी जास्त पंचाईत होते, ह्या आता कामे करू शकत नव्हत्या, कारण बाहेर गेल्या की परत यायला घर सापडले नाही तर? 

आई आली की, गप्पा आणि भटकंतीला सुमार नसतो. डिसेंबर  २०२१ मधे, आई मुंबईला माझ्याकडे येणार समजले तसे मावशीला देखील मुद्दाम बोलावले. गप्पा टप्पा झाल्या, मावशीने (आईची आत्ये बहीण), तिच्या ओळखीत एका बाईंना विस्मरण होते म्हणून सांगितले. त्यांची आर्थिक स्थिती  चांगली नसल्याने औषध उपचार मिळत नसल्याची खंत देखील तिला वाटत होती. त्या ताई स्वयंपाकाची कामे करायच्या पण, गॅस चालू राहतो, वस्तू कुठे ठेवली आठवत नाही, त्यामुळे चिडचिड, हातावरचे पोट, सगळी कामे गेली ... कोऱ्या चेहऱ्याने एकट्या बसून असतात, बोलायचे सुचत नाही, आणि त्यांचा नवरा देखील काही कमवत नसल्यामुळे, ह्यांचे आजारपण सुरू झाले तशी जास्त पंचाईत होते, ह्या आता कामे करू शकत नव्हत्या, कारण बाहेर गेल्या की परत यायला घर सापडले नाही तर? 

Bach Flower Remedies मुळे त्यांना काही मदत झाली तर बघू, असे सांगून मी मावशीला त्यांचा फॉर्म भरायला सांगितला. त्या बाईंना मी पाहिले नव्हते, पण वागणे, बोलणे आणि स्वभाव ह्या विषयी माहिती घेऊन साधारण चार महिने पुरेल एवढे औषध पाठवले. Introduction session साठी मावशीला मेसेज केला तेव्हा तिने त्या बाईंना फरक पडलेला सांगितला. थोडे थोडे आठवायला लागले आहे आणि त्यांना पुन्हा औषधे हवी आहेत. त्यानंतर दोन वेळेस पुष्प औषधी पाठवल्या, साधारण सहा ते आठ महिने त्यांनी एकही दिवस न चुकता औषध घेतले ह्याचे मला कौतुक वाटले. ह्यांच्या कडे साधा मोबाईल असल्यामुळे Google meet व्हिडिओ वर भेट होणे शक्य नव्हते. पुढची औषधे पाठवण्या आधी एकदा भेटायचे ठरवले, आणि त्या ताई रहातात त्या भागात काम असल्यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. एक छोटी खोली, शिवण काम करत बसलेल्या. एवढे नियमित औषध घेतल्याचे कौतुक केले तेव्हा, त्यांच्या आईना हा त्रास असल्याचे समजले, आईं सारखी माझी अवस्था नको... गेल्या महिन्यात सहज मावशी सोबत फोन झाला, तेव्हा त्या एकट्या बसने फिरतात आणि पुन्हा स्वयंपाकाची कामे शोधत आहेत हे समजले. पुन्हा काही लागत असेल तर बघावे म्हणून चार दिवसा पूर्वी फोन केला, तेव्हा वयानुसार तब्येतीच्या बाकी तक्रारी आहेत पण मानसिक रीत्या उत्तम आहे त्यामुळे आता औषध नाही पाठवले तरी चालेल, असे म्हणाल्या. सोमण काकूंकडे देखील त्यांनी वय झाल्यावर होणारा भ्रम, विस्मरण किंवा विचित्र वागणे ह्यावर Bach Flower Remedies दिल्यामुळे फायदे झाल्याचे सागितले होते... घरात असा पेशंट असल्यास Bach Flower Remedies बद्दल माहिती असल्यास sos basis वर कॉम्बिनेशन बदलता येते. Proof काय तर अनुभव.. कुणाला मदत करू शकलो हे समाधान वेगळाच आनंद देऊन जाते. श्रीकृष्णार्पणमस्तू ...

Anagha Walimbe, BFRP

14 March 2023.