Bach Flower Remedies use flower essences to balance emotions by addressing specific emotional states. They promote gentle healing, transform negative emotions into positive ones, and support emotional awareness and personal growth. These remedies are complementary to other therapies, safe for all ages, and take a holistic approach to emotional well-being.
आयुष्यातील छोट्या मोठ्या अडचणीत Bach Flower Remedies सोबत असताना अनेक प्रकारे अडचणींवर मात करता येते. भावनिक अस्वस्थता दूर होऊन मन:शांतीचा अनुभव येतो. ध्येय गाठण्याच्या प्रवासात मनोबल, आत्मविश्वास, धैर्य आणि सातत्य प्रदान करणाऱ्या पुष्प औषधी ह्या वयाच्या कोणत्याही टप्प्यावर उपयोगी पडतात. तुमच्या साठी किंवा प्रिय व्यक्ती साठी Bach Flower Remedy ही पर्यायी उपचार पद्धती मनाचे संतुलन साधण्यास मदत करू शकते.
बाख पुष्प औषधी विषयी अगदी थोडक्यात
प्रसिद्ध फिजिशियन, Bacteriologist आणि Homeopath डॉक्टर एडवर्ड बाख ह्यांनी १९३०च्या दशकात पुष्प औषधींचा शोध लावला. रोग जरी सारखाच असला तरी, बरे होण्याचा कालावधी हा माणसाचे विचार आणि भावना ह्या प्रमाणे बदलतो. रोग किंवा व्याधी म्हणजे काय हे सांगताना डॉक्टर बाख ह्यांनी लिहिले होते "Disease of the body itself is nothing but the result of the disharmony between soul and mind. Remove the disharmony, and we regain harmony between soul and mind, and the body is once more perfect in all its parts."
Bach Flower Remedy किंवा बाख पुष्प औषधी ही एक alternative holistic healing system आहे, जी timeless आहे आणि सगळ्या प्रकारच्या भावनिक समस्या सोडवण्यासाठी supportive देखील आहे.
🔸Alternative - एक पर्यायी उपचार पद्धती असली तरी, इतर उपचारा सोबत सुरू करता येते. इतर औषधांचे ह्यात प्रामुख्याने Allopathy चे dose मनाने कमी किंवा बंद न करता, सोबत घेणे फायदेशीर असल्याचे अनुभव अनेकांना येतात. Remedies are supportive.
🔸Holistic - उपचारादम्यान कोणतेही शारीरिक क्लेश होत नाही, शिवाय मानसिक क्लेश कमी होत असल्याचा अनुभव अनेकांना येतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे उपचाराची सवय लागत नाही, उपचार Non addictive आहेत. Bach Flower Remedies are Safe, Gentle and Non Toxic. अगदी Pregnancy दरम्यान होणाऱ्या मनाच्या अवस्थेत देखील त्या support करतात, breast feeding mom's ज्यांना इतर जबाबदाऱ्या पूर्ण करून बाळाची काळजी घ्यायची असते. सातव्या महिन्यापासून बाळाला सोडून कामाला जाणे अवघड होते, मूल देखील काही काळ आई नसल्यामुळे असुरक्षित वाटल्याने रडते. वरचे पाणी पिऊ लागलेल्या बाळा पासून ते वयोवृद्ध, आजारी व्यक्तीला देखील safely देता येतात, ह्याचे कोणतेही साईड इफेक्ट नसतात.
🔸Healing - नियमित मेडिटेशन म्हणजेच ध्यान धारणा केल्याचे फायदे सगळ्यांना माहिती आहेत, पण मन अस्थिर असताना, मनाची अवस्था चांगली नसताना किंवा खूप अडचणीत असताना Mindfulness, meditation वगेरे अशक्य वाटते. Meditation अशक्य नाहीच, काही वेळेस जमेलही पण सातत्य ठेवणे जिकिरीचे होते, कारण विचाराचे चक्र कसे थांबवायचे हे समजेनासे होते, कळतय पण वळत नाही आणि अशा वेळेस Bach Flower Remedies मुळे अलगदपणे balance साधला जातो, अगदी नकळतपणे बदल होतात.
Mind, Body, soul ह्यामधे समतोल साधता येणे ही अनुभव घेण्याची गोष्ट आहे. तारतम्य, विवेक बुद्धी किंवा Balance असताना आपण अनेक साध्या किंवा सोप्या वाटणाऱ्या गोष्टी गृहीत धरत असतो. समतोल गेल्यावर बऱ्याचदा समतोल असल्याचे महत्व अधोरेखित होते.. जसे ऑक्सिजन मास्क लावायला लागेपर्यंत निसर्गाने दिलेले वातावरण आणि आपली श्वास घेण्याची नैसर्गिक क्षमता किंवा क्रिया, हे किती अमूल्य आहे ह्याची जाणीव आपल्याला नसते, अगदी तसेच मन अस्थिर होते तेव्हा समतोल किती महत्वाचा असतो, ह्याची जाणीव होते.
Holistic Healing is a journey and not a destination - उपचार करताना माणसाचा स्वभाव, भावना, वागणूक तसेच परिस्थिती नुसार वागण्यात होणारे बदल, ह्याप्रमाणे personal mix घेता येते.
🔸Personal Mix काय असते?
३८ पुष्प औषधी आणि Rescue Remedy हे पाच औषधांचे कॉम्बिनेशन ह्यापैकी किमान एक ते जास्तीत जास्त सात Bach Remedy एकत्र केल्यावर Personal mix तयार होते.
🔸Why Personal Mix?
खूप जण Exam combination, Relationship, sound sleep अशी तयार कॉम्बिनेशन विकत घेतात. पण त्यातली प्रत्येक Remedy आवश्यक असेलच असे नाही. परीक्षा ही situation जरी समान असेल तरी आवश्यक असणाऱ्या Remedies ह्या ३८ पैकी कोणत्याही ७ असू शकतात. कॉम्बिनेशन फॉर्म्युला प्रमाणे, 1.26 कोटी प्रकारची unique कॉम्बिनेशन तयार होतील. व्यक्ती तितक्या प्रकृती, म्हणूनच तुमच्या साठी किंवा तुमच्या प्रिय व्यक्ती साठी पर्सनल मिक्स घेणे हे अधिक लॉजिकल आहे.
🔸Know Your Personal Mix
BFRPs, Doctors, Homeopathy Doctor ह्यांच्या कडून तुमचे पर्सनल मिक्स आणू शकता. BFRP सोबत consultation चा फायदा म्हणजे, तुम्हाला आवश्यक Bach Flower remedies ची नावे समजतात, त्याबद्दल माहिती समजते आणि homeopathy दुकानातून तुम्ही तुमचे पर्सनल मिक्स आणू शकता.
🔸BFRP कोण असतात?
BFRP म्हणजे Bach Foundation Registered Practitioner. Bach Centre UK च्या तीन levels पूर्ण झाल्यावर जगभरात कुठेही Bach Remedy practice करू शकतात. काही देशात होमिओपॅथी डॉक्टर BFRP असल्या शिवाय Bach Flower Remedies practice करू शकत नाही.
🔸किती दिवस घ्यायचे?
हा प्रश्न सगळ्यांना पडतो. ज्या प्रकारची समस्या असेल त्याप्रमाणे घेऊ शकतो, म्हणजे काही वेळेस SOS अगदी किमान एक dose ते अगदी दोन तीन दिवस घेतले तरी फायदा झालेला जाणवतो आणि तेवढे देखील पुरेसे असते. Cumulative effect साठी Personal mix किमान तीन आठवडे नियमित घेणे आवश्यक. Indian Brand वापरत असल्यास अर्धा कप पाण्यातून चार थेंब चार वेळेस असा dose घेणे आवश्यक असते. होणारे फायदे किंवा वागण्यातील बदल पाहून त्याप्रमाणे Remedies मधे बदल करणे देखील आवश्यक असते. म्हणजे उदाहरणार्थ, आता अगदी सतत निराश वाटत नाही, पण अधून मधून low feel होते, अशा वेळेस मला कोणीच समजून घेत नाही असे वाटू लागले आहे, ज्यामुळे चिडचिड वाढली आहे. ही समस्या जुनीच असते, पण ती भावना आत दाबून टाकली जाते आणि onion layer peeling प्रमाणे निराशेचा पापुद्रा निघून जातो, आणि आता वेगळी समस्या जाणवू लागते अशा वेळेस Follow-up आवश्यक असतो.
🔸Self Healing स्व उपचार - २४ सप्टेंबर १९३६ मधे डॉक्टर बाख ह्यांच्या ५०व्या वाढदिवशी, Bach Flower Remedy ही सेल्फ healing स्व उपचार पद्धती सर्व सामान्यांना वापरण्यासाठी खुली केली असली तरी, अजूनही खूप जणांना ह्याचे फायदे माहिती नाहीत. बरेच जण म्हणतात, तेव्हा अडचणी वेगळ्या होत्या आताच्या काळात फायदा होईल का?
🔸Timeless - कोरोना काळात खूप जणांनी निराशा, भिती, आणि हताश पण अनुभवले आहे. कारण lockdown सारखा अनुभव आणि अशी विचित्र वेळ येईल, ही कल्पना देखील कोणी केली नव्हती. अशी वेगळी, अनभिज्ञ परिस्थिती, पण त्याकाळात देखील बाख पुष्प औषधी उपयोगी पडल्या एवढेच नाही तर येणाऱ्या भविष्यात देखील, अगदी अकल्पित, पूर्ण अनभिज्ञ परिस्थिती उदभवली तरी देखील त्याचा उपयोग होणार. कारण माणूस आहे म्हणजे भावना आल्या, आणि भावना समजल्या की उपाय करता येतात. हल्ली बरेच वेळा आपण भावना शून्य माणसे बघतो, तर अशा कोरड्या माणसामधे भावना जागृत करण्यापासून पासून ते षडरिपूंवर नियंत्रण मिळवून वागण्यावर ताबा मिळवण्यापर्यंत सगळ्या गोष्टीत पुष्पऔषधी मदत करतात.
The Problem and Solution: मनाची अवस्था चांगली नसताना किंवा खूप अडचणीत असताना विचाराचे चक्र कसे थांबवायचे हे समजेनासे होते. काही वेळेस आयुष्यात खूप अडचणी असतात आणि अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे हे सुचत नसते, त्या अवस्थेमध्ये एकटे पडल्याची भावना अधिकच त्रासदायक वाटू लागते. काही वेळेस वाटतं की आता मला नाही जमणार, अगदी कंटाळा आलाय ह्या आयुष्याचा. आपण शारीरिक आरोग्याला जेवढे महत्व देतो तेवढे महत्व मानसिक आरोग्याला देतो का? मध्यम वर्गीय मानसिकता असलेला माणूस बरेच वेळा मानसिक आरोग्याकडे फॅड किंवा अनावश्यक खर्च म्हणून बघतो. सुखवस्तू कुटुंबातील व्यक्ती जेव्हा भावनिक अडचणी विषयी तक्रार करते तेव्हा काही प्रॉब्लेम नाहीये हाच प्रॉब्लेम आहे अशी टिप्पणी समाज करत असतो. भावनिक अडचणी विषयी सहसा कोणी बोलत नाही. यश हुलकावणी देत असताना नशीब, ग्रहदशा, वास्तू, किंवा परिस्थितीला दोष देण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्यावर काम करायला हवे. जसे आपले विचार, सवयी आणि दृष्टीकोन. काही झाले तरी परिस्थितीचे गुलाम बनू नका.
Anagha Walimbe, BFRP